शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यात उभारली नाही गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:54 IST

कडेगाव : माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने कडेगाव तालुक्यात दु:खाचे सावट कायम आहे. गावोगावी कार्यकर्ते व ग्रामस्थ अद्याप दु:खातून सावरले नाहीत. यामुळे अपवाद वगळता गावोगावी गुढ्या उभारण्यात आल्या नाहीत. अत्यंत शोकाकूल वातावरण असल्यामुळे गुढीपाडव्याचा सणच केला नाही.कडेगाव तालुका विकासाचे आदर्श मॉडेल करणारा आणि हरितक्रांती करून तालुक्याच्या सर्वांगीण ...

कडेगाव : माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने कडेगाव तालुक्यात दु:खाचे सावट कायम आहे. गावोगावी कार्यकर्ते व ग्रामस्थ अद्याप दु:खातून सावरले नाहीत. यामुळे अपवाद वगळता गावोगावी गुढ्या उभारण्यात आल्या नाहीत. अत्यंत शोकाकूल वातावरण असल्यामुळे गुढीपाडव्याचा सणच केला नाही.कडेगाव तालुका विकासाचे आदर्श मॉडेल करणारा आणि हरितक्रांती करून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची गुढी उभा करणारा आमचा नेता हरपला आहे. त्यामुळे गावोगावी गुढी उभारली नाही.कडेगाव तालुक्यात कडेगाव शहर, वांगी, चिंचणी, देवराष्ट्रे, आसद, पाडळी, सोनसळ, शिरसगाव, सोनकिरे, अंबक, मोहित्यांचे वडगाव, शिरगाव, रामापूर, तडसर, अपशिंगे, सोहोली, शिवणी, नेवरी, शाळगाव, तोंडोली आदी गावातील ग्रामस्थांनी रविवारी गुढीपाडव्यादिवशी गुढी उभारली नाही. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने शोकाकूल ग्रामस्थांनी गुढी उभारली नाही, असे संदेशही सोशल मीडियात फिरत आहेत.कदम यांनी हजारो कुटुंबांचे संसार फुलविले आहेत. भारती विद्यापीठ व सोनहिरा कारखाना परिवार पोरका झाला आहे. सोनहिरा खोऱ्याचा तर आधारवड निखळला आहे. यामुळे येथे गुढी उभारली नाही, असे गावोगावच्या ग्रामस्थांनी सांगितले.तालुक्यातील अनेक यात्राही रद्दकडेगाव तालुक्यातील पाडळी, आसद, सोनसळ, मोहित्यांचे वडगाव आदी गावातील यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, भिकवडी खुर्द येथील यात्रेचे धार्मिक विधी वगळता सर्व करमणुकीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती संबंधित गावातील ग्रामस्थांनी दिली.वांगीत पतंगराव कदम यांना श्रध्दांजलीवांगी : वांगी (ता. कडेगाव) परिसरात आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच गावात एकही घरात गुढी उभारण्यात आली नाही. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे वांगी, शिवणी, शेळकबाव, येवलेवाडी, हणमंतवडिये, वडियेरायबाग गावात दु:खाचे सावट अद्यापही कायम असल्यामुळे आज गुढीपाडव्याचा सण व गुढी उभी न करता डॉ. पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. वांगी परिसरात गावात एकही गुढी उभी केली नाही.